शनिवार, ३० एप्रिल, २०११

श्री गणेशा....!!

मातृ देवो भव: || पितृ देवो भव: || गुरु देवो भव ||

आई, वडिल  आणि गुरु ह्या तीन देवतांना स्मरून मी माझ्या ब्लॉग "अंतर्नाद" ची सुरुवात करतेय. कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात आपण आपल्या कुलदेवतेला स्मरून अथवा गणेशवंदना करून करतो परंतु माझ्यासाठी हेच माझे खरे दैवत आणि हाच माझा "श्री गणेशा"...

ह्या ब्लॉग-विश्वाची माझी जास्त जुनी ओळख नाही पण एक वाचक म्हणून माझ्या या जुळलेल्या नात्याला आता दीड वर्षे होतील. :)
असेच  एकदा गुगलिंग करता करता ह्या ब्लॉग-विश्वाचा खजाना सापडला आणि ह्या विश्वाने मला मोहून टाकले. रोज नवनवीन लोकांचे अफलातून अनुभव, त्यांचे विचार, बऱ्याच गमती जमती, कडू-गोड आठवणी आणि असे बरेच काही वाचायला मिळाले...ही बिनपरिचयाची परकी लोकं मनात एक घर करून गेली, हळूहळू त्यांचे परकेपण संपत गेलं आणि ही सगळी मंडळी आपलीशी वाटू लागली.     

या ब्लॉग-विश्वात बरयाच जणांशी ओळखी झाल्या, खूप चांगले मित्र-मैत्रिणी मला मिळाले. बरयाच जणांनी मला माझा ब्लॉग सुरु करण्यासाठीही प्रोत्साहन केले...या सर्वांना धन्यवाद आणि खूप खूप आभार...

मीही एक छोटासा प्रयत्न करणार आहे, मला काही आवडलेलं, मला पटलेलं मी तुम्हा सर्वांशी इथे share करणा आहे...माझ्या मनातला आवाज 'अंतर्नाद' तर्फे तुमच्यापर्यंत पोहचवणार हे... माझ्या या ब्लॉग वर सर्वांचे नेहमीच स्वागत असणार आहे. तुमच्या प्रतिक्रिया आणि मार्गदर्शन नक्कीच सुचवा आणि तुम्हा सर्वांचा आशीर्वाद आणि शुभेच्छा सदैव पाठीशी राहू द्या :)


- अर्चना

८ टिप्पण्या:

  1. आभिनंदन!! लिहित रहा.. आम्ही आहोत वाचायला. फक्त नियमीत पणा ठेव. पुढील लिखाणासाठी शुभेच्छा. आणि marathiblogs.net वर रजिस्टर कर ब्लॉग.

    उत्तर द्याहटवा
  2. अभिनंदन आणि हार्दिक स्वागत !
    लवकरात लवकर नवीन नवीन लिखाणाची मेजवानी हवीय ! :)

    उत्तर द्याहटवा
  3. अर्चना,जालनिशी विश्वात स्वागत आहे तुझे!
    पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

    उत्तर द्याहटवा
  4. धन्यवाद महेंद्र काका...तुम्ही सर्वजण वाचायला आहात म्हणूनच लिहायला घेतलंय :) आणि marathiblogs.net वर ब्लॉग रजिस्टर करायचा प्रयत्न चालू आहे...

    धन्यवाद सुहास आणि दीप :) तुम्हा दोघांना लवकरच नवीन नवीन मेजवानी द्यायचा प्रयत्न करीन ;)

    आणि धन्यवाद देव काका तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद नेहमी राहुदे...

    उत्तर द्याहटवा